City & Industrial Development Corporation [CIDCO] — Get an alternative plot in lieu of a hotel that went to a railway project.
Bhanudas Bhoir
from Navi Mumbai, Maharashtra
Jul 21, 2021
Address: Belapur, Navi Mumbai
संदर्भ. (1) Dist/CLTH/2019/9007 दि. 25/08/2019 रोजीची तक्रार. मी कोपरीगावातील स्थानिक रहिवाशी असून माझ्या वडिलांचे सन 1968 सालापासून सर्वे न. 168, गुरुचरण पावणेनाका या जागेत उदरनिर्वाहसाठी न्यू बॉम्बे नावाचं हॉटेल बांधले होते. सन 1972 ला हॉटेलचे बांधकाम अनधिकृत आहे आम्हाला सिडको कडून क्र. सिडको/सीयुसी/टी-107 ही नोटीस मिळाली सदरचे नोटिसावरून सिडको तर्भे दि. 22/11/1972 ला जे. एन. एफ. सी. कोर्ट ठाणे येथील -1 (एक) नंबरच्या दिवाणी कोर्टात हॉटेलचे बांधकाम अनधिकृत असल्याची फौजदारी केस दाखळ केली होती पुढे आठ वर्ष कोर्टात चक्करा मारल्या पण आमचे हॉटेल सन. 1968 पासून अस्तित्वात असल्याने जुने कागद पुरावे कोर्टाला सादर केले दि. 4/10/1980 रोजी कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला त्यानंतर सिडकोने हॉटेलचे बांधकाम अधिकृत करून घेतले. दि. 28/04/1987 रोजी सिडको कडून क्र. सिडको/सियुसी/1929. रेल्वे प्रकल्पासाठी हॉटेलच्या बदल्यात पर्यायी भूखंड मिळेल अशी नोटीस मिळाली त्यांनतर सिडको कार्यालयात जाऊन आमच्या कडची कागदपत्रे जमा करून पर्यायी भूखण्डाचा फॉर्म भरून दिला. त्यानंतर सिडको कार्यालयात बऱ्याच चकरा मारल्या, अधिकारी सांगत तुम्हाला पर्यांयी भूखंड भेटणार, बऱ्याच लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशी उत्तरे बऱ्याच वर्ष ऐकली तीच आश्वासने घरी घेऊन येत आम्हाला सांगत तीच आश्वासने आज पर्यंत बाळगून आहोत. स्थानिक आमदार मा. गणेश नाईक साहेब यांची भेट घेतली दि. 05/10/1992 व दि. 18/02/2006 रोजी नाईक साहेबांनी सिडकोला प्रत्र दिले पण काहीही उपयोग नाही. दि. 14/12/2015 रोजी वकील राजेश तांडेल यांच्यामार्फत, सिडकोला पत्र व्यवहार केला पण काही उपयोग झाला नाही दि. 27/04/2018 रोजी माहितीचा अधिकाराचा अर्ज दाखल केला. दि. 13/05/2018 रोजी प्रथम अपील दाखल केला. दि. 16/07/2018 रोजी द्वितीय अपील दाखल केला अपील क्र. KR 2794/2018 त्याची सुनावणी दि. 01/08/2019 रोजी झाली. सिडको अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले कि महाराष्ट्र शासनाने पर्यांयी भूखंड देण्याची योजना बंद केली आहे. जर पर्यांयी भूखंड देता येत नसेल तर त्याच जागी आमचे हॉटेल परत बांधून दयावे जेणे करून आमच्या उदरनिर्वाह व आजपर्यँत हेलपाटे मारले त्याचा खर्च मिळावा ही विनंती आपला विश्वासू
+1 photos
Was this information helpful?
No (2)
Yes (4)
City & Industrial Development Corporation [CIDCO] customer support has been notified about the posted complaint.
Jul 21, 2021
Updated by Bhanudas Bhoir great helpful
Add a Comment
Share
Related City & Industrial Development Corporation [CIDCO] reviews
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment