Address: C-43,AMOL CHS LTD, V.B. PHADKE MARG, MULUND EAST, MUMBAI - 400081 |
प्रति
सहाय्यक आयुक्त
बृहन्मुंबई महानगरपालिका – टी विभाग
मुलुंड पश्चिम
मुंबई ४०००८०
विषय :- मलनि:सारण पाईपलाईन मधून सोसायटीच्या परिसरात होणाऱ्या विसर्गाबाबत तक्रार
आदरणीय महोदय,
मी, खाली सही करणार सचिव, अमोल सहकारी गृहनिर्माण संस्था, मुलुंड पूर्व. आमच्या संस्थेच्या आवारात दिनांक २० एप्रिल २०२४, पासून दररोज drainage line (मलनि:सारण लाईन) मधून संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणात घाणेरड्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्याबद्दल तक्रार नोंदविण्याकरीता वारंवार आपल्या आपल्या कंट्रोल रूम सोबत आम्ही संपर्क केला, तेथून प्रत्यक्ष परिस्थिति जाणून घेण्याकरिता टीम पाठवण्याबाबत आम्हांस आश्वस्त करण्यात आले, व प्रत्यक्ष तक्रार नोंदवून साधारण ४-५ दिवसांच्या विलंबाने आपल्या विभागाकडून एक टीम संस्थेच्या आवारात परिस्थितीचे निरीक्षण करण्याकरिता दिनांक २ मे २०२४ रोजी आली
होती. सदर टीमने सर्व man-hole ची झाकणे उघडून निरीक्षण केले असता, drainage line मधील पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाण्याची पातळी वाढण्याचे कारण विचारले असता, संस्थेच्या
drainage line जिथे महानगरपालिकेच्या line सोबत जोडल्या आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या line मध्येच पाण्याची पातळी अधिक असल्यामुळे संस्थेच्या drainage line मधून पाणी बाहेर जाणे शक्य होत नसल्याचे तसेच बाहेरील महानगरपालिकेच्या line मधून संस्थेच्या drainage line मध्ये पाण्याचा उलट विसर्ग होत असल्याचे आपल्या टीमने आम्हांस सांगितले.
ह्यावर काय करता येईल अशी विचरणा केली असता, मुलुंड पूर्व येथील नानेपाडा येथे महानगरपालिकेची drainage line जी pumping centre सोबत जोडलेली आहे, ती फुटली आहे आणि pumping बंद असल्यामुळे सर्वच underground drainage line मध्ये पाणी पातळी कमी होत नसल्याचे त्यांच्याकडून
आम्हांस सांगण्यात आले. तसेच ह्या फुटलेल्या drainage line च्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्याची दुरुस्ती झाल्यावरच सदर line मधील पाणी पातळी कमी होऊन संस्थेच्या line मध्ये उलट विसर्ग होण्याचे थांबेल असे देखील त्यांच्याकडून आम्हांस सांगण्यात आले.
मात्र त्यानंतर आज प्रत्यक्ष एक आठवडा झाला तरीदेखील संस्थेच्या आवारात घाण पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, ज्यामुळे सर्वत्र दुर्गंध तर पसरतो आहे, ज्यामुळे संस्थेच्या राहिवास्याच्या आरोग्यास देखील अपाय होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. ह्या परिस्थितीवर आपल्याकडून लवकरांत लवकर उपाय योजना करण्यात यावी अशी ह्या पत्राद्वारे आम्ही आपणांस विनंती करीत आहोत.
आपण कृपया त्वरित एक टीम आमच्या संस्थेच्या आवारात उद्भवलेल्या ह्या समस्येचे निरीक्षण करण्याकरिता पाठवावीत तसेच आधीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार खरोखरीच pipe line फुटल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्यास, महानगरपालीकेच्या दुरुस्तीच्या कामात होणाऱ्या विलंबामुळे आमच्या रहिवास्याना होणाऱ्या त्रासावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी आपणांस विनम्र विनंती करतो.
धन्यवाद,
आपले विनम्र,
अभिजीत सामंत
सचिव,
अमोल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, मुलुंड पूर्व.
मोबाईल :- ९८२०५ ६३८०१
Was this information helpful?
Post your Comment