Address: Nagpur, Maharashtra, 440024 |
Website: SNDL NAGPUR |
प्रती
संचालक / प्रबंधक
एसएनडीएल, नागपूर
विषय : 1) जुलै 2018 च्या बील मध्ये चुकीचे रिडिंग दाखविण्या बद्दल
2) तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा रोड, नागपूर केन्द्र येथील कर्मचारी आणि केन्द्र
प्रमुख श्री बंडू पराडकर यांचे द्वारा केलेल्या दुर्व्यवहार आणि दूर्वर्तन बद्दल
संदर्भ: ग्राहक क्रमांक :[protected] तक्रार क्रमांक [protected]
महोदय,
कृपया खलील मुद्दे विचारात घेवून योग्य ती सुधारणा करावी हि विनंती
1) मला जुलै 2018 चे बिल प्राप्त झाले जे रू. 5, 010/- चे आहे. त्यात चालू रिडिंग 8164 – 7676 मागील रिडिंग असे एकूण रिडिंग 489 दर्शविण्यात आलेले आहे, पण आमचे जून चे बिल मधील चालू रिडिंग 7953 असे होते. (जे जुलै 2018 चे मागील रिडिंग दर्शविले पाहिजे होते.)
2) मी आपल्या वरील पत्त्यावरील ऑफिस मधे चौकशी केली. पण प्रथम तेथील कर्मचारी आणि अधिकारी यांना वरील चूक दिसली नाही, या फारका बद्दल मी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर माझी बिल समयोजन तक्रार घेतली. आज दि 28.07.2018 ला परत चौकशी साठी ऑफिस मध्ये गेलो असता काउंटर क्र. 1 क्रमांका वरील कर्मचारी यांनी पुन्हा 3900/- इतके बिल आहे असे तोंडी सांगीतले. रिवाईज प्रिंटेड बिल मागितले असता त्या बद्दल योग्य माहिती न देता उद्धट पणे बोलले याची तक्रार केन्द्र श्री प्रमुख बंडू पराडकर यांचे कडे करून प्रिंटेड बिल मागितले व ते मिळाल्यावर सिस्टम मध्ये एंट्री केली का असे विचारता ज्या दिवशी बिल भराल त्या दिवशी पुन्हा तुम्हाला यावेच लागेल असे पुन्हा उद्धट पणे बोलले या विषयी पुन्हा केन्द्र प्रमुख श्री बंडू पराडकर यांचे कडे केली असता त्यांनी आपले कर्मचारी यांचीच बाजू घेवून आम्हाला उलट उत्तर दिले. एक कर्मचारी पूर्ण जनते समोर ग्राहकांसोबत असे उद्धट पणे बोलतात आणि वागतात त्या बद्दल कर्मचार्यां ना समजावयाचे सोडून केन्द्र प्रमुख श्री बंडू पराडकर हे सुद्धा ग्राहकांसोबत दुर्व्यवहार आणि दूर्वर्तन करतात.
3) वरील उल्लेखित बिलांबद्दल मला वारंवार आपल्या ऑफिस मध्ये चक्कर मारावे आणि मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागला. चूक आपल्या कंपनीची / कर्मचारी यांची आणि त्रास ग्राहकांना. वरुण आपले कर्मचारी असे दुर्व्यवहार आणि दूर्वर्तन करतात. हे सगळे तिरस्कारणीय आणि क्लेशकारक आहे.
4) आपणास आता अशी विनती आहे वरील दोन्ही घटना यांची चौकशी करून या बद्दल खेद व्यक्त करावा आणि वर उल्लेखित कर्मचारी तसेच अधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी आणि तसे मला लिखित कळवावे.
आशा आहे आपणाकडून ताबडतोब आणि योग्य कारवाई होऊन मला माझ्या तक्रारीचे उत्तर मिळेल. (या बद्दल मी एसएनडीएल हेल्पलाइन [protected] या नंबर वर आज 28.07.2018 ला 10:51 ला सुद्धा तक्रार केली आहे पण ते सुद्धा योग्य समाधान करू शकले नाही )
(माझ्या सारख्या जेष्ठ नागरिक( वय वर्ष 76) यांना अश्या वागणुकीची अपेक्षा नसते यास्तव आपणा कडे तक्रार करीत आहे. )
आपली विश्वासु
श्रीमती अंजली आंबेकर
द्वारा महेश आंबेकर
7, साईमंदिर मार्ग अयोध्यानगर नागपूर-440024
Was this information helpful?
Post your Comment