महोदय,
आम्ही शिवम सोसायटी, शिव साई लेन, पिंपळे सौदागर मधले रहिवासी आहोत. आमच्या सोसायटी जवळ लक्ष्य वाईन शॉप आहे. इकडे मद्यपान विक्री होते. दुकान मालकाने दुकान बाहेर अनधिकृत शेड केले आहे. त्यामुळं तिकडे भरपूर गर्दी होते आणि रहदारीस त्रास होतो. रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु असते आणि बरीच लोक बेकायदेशीर शेड मध्ये दारू पितात.
शॉपमुळे रस्त्यावर अस्वच्छता खूप वाढली आहे . बॉटल्स, प्लास्टिक ग्लास आणि इतर कचरा जमलेला दिसतो. जाता येता बायकांना आणि लहान मुलांना घाबरायला होत. शेड असल्यामुळे बरेच लोक बसून राहतात आणि मद्यपान करतात. सोसायटीच्या भिंतीवर लघवी करतात. बायकांकडे घाण नजरेनं बघतात. कार, रिक्षामध्ये बसून चाळे चालु असतात.
आम्ही तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर कारवाई करा आणि अनधिकृत शेड काढून आम्हाला ह्या त्रासापासून मुक्त करा.
रहिवासी शिवम सोसायटी Was this information helpful? |
In najafgarh all wine shop they said machine is not working, liqour avalaible if we paid cash.